Monday, October 25, 2021

खा.सुजय विखे संतापले, म्हणाले ‘त्याला’ धरून मारू का

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर – शिर्डी यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या रखडले आहे. याचा ठेकेदार काम करीत नाही, कोणाचे ऐकत नाहीअशा तक्रारी आहेत. या तक्रारींचा पाढा खा.विखे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाहीरपणे मांडला होता.

आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या झालेल्या कार्यक्रमात पुन्हा हा विषय निघाला. त्यावर विखे पुन्हा संतप्त झाले.‘खासदार म्हणून जे करायचे ते मी करीत आहे. यापुढे जाऊन त्या ठेकेदाराला धरून मारू का? असा उद्विग्न प्रश्नच त्यांनी उपस्थितांना केला.

यासंबंधी आपण सोशल मीडियावर मोहीम चालविणार असून याचे काय करायचे, हे आता लोकांनीच सूचवावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. शेवगाव शहरातील एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा विषय निघाला.त्यावर भाष्य करताना डॉ. विखे आक्रमक झाले. विखे म्हणाले, ‘ कोविड संसर्गामुळे केंद्र सरकारने बहुतांश निधी लसीकरण आणि अन्य उपाययोजनांच्या कामाकडे वळविला आहे.

रस्त्यांच्या कामासाठी आता पैसाच नाही.त्यामुळे सध्या तरी टोल लावल्याशिवाय रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. टोलसाठी द्याव्या लागणाऱ्या पैशापेक्षा त्या रस्त्यामुळे झालेल्या फायद्याची किंमत मोठी असते. हे लक्षात घेतले पाहिजे.

मंत्री गडकरी यांनी जेव्हा सुरुवातील टोल रस्त्यांची संकल्पना मांडली, त्यावेळी विरोध झाला होता. आता याचे फायदे लक्षात आले आहेत. त्यामुळे रस्ता हवा असेल तर आता टोलशिवाय पर्याय नाही.

माझे हे म्हणणे कदाचित लोकांना पटणार नाही, त्यावर टीकाही होईल. मात्र, यावर कधी ना कधी गांभीर्याने विचार करावाच लागले. अहमदनगर -शिर्डी रस्त्याचे काम सध्या ठप्प झाले, त्याला जबाबदार ठेकादार आहे.

त्याच्याविरूद्ध तक्रारी केल्या. मात्र, उपयोग होत नाही. खासदार म्हणून मी आणखी काय करू शकतो? काम सुरू झाले तर तेथे उभा राहून ते करून घेऊ शकतो. मात्र, तो ठेकेदार जर यायलाच तयार नसेल तर कसे करायचे.

मी खासदार म्हणून पाठपुरावा करून थकलो आहे. आता तुम्हीच सांगा, त्याचे काय करायचे? धरून मारायचे का? की गुन्हा दाखल करायचा? काय करायचे ते आता तुम्हीच सांगा. असेही डॉ. विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!