Sunday, October 17, 2021

नगरमध्ये रामदास आठवलेंचे मोठं विधान:अजित पवारांच्या नातेवाईकांवर कारवाई

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: केंद्रीय मंत्री रामदास आठवले आठवले हे आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या बरोबरच जिल्ह्याच्या दौऱ्याला आले होते. त्याची सुरुवात त्यांनी राजूर पासून केली. तेथे ते भाजपाचे नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना भेट दिली.

त्यांनी अकोले येथे पत्रकारांशी परिसंवाद संवाद साधला.राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केलेली प्राप्ती कर खात्याची कारवाई ही आकस बुद्धीने नसून, या कारवाईचा केंद्राशी कोणताही दुरान्वये संबंध नाही

असा निर्वाळा केंद्राचे सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.अनावश्यक संपत्ती व आर्थिक व्यवहाराची अनियमितता याबाबत असणार्‍या प्राप्तिकर विभागाने आपली कारवाई केली. त्यामुळे याचा केंद्राशी दुरान्वयाने संबंध नाही अशी पुस्ती त्यांनी जोडली.

मात्र अजित पवार यांच्यावर पाटबंधारे विभागाच्या संदर्भात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले.जालियनवाला बाग घटनेशी तुलना अयोग्यराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखिमपूर घटनेची तुलना जालियनवाला बाग या घटनेशी केलेली आहे.

याकडे आठवले यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी जालियनवाला बाग घटनेशी लखिमपूर घटनेशी तुलना करणे अयोग्य आहे आणि एकूणच या प्रकाराबाबत येत्या ११ तारखेचा राज्यात पुकारलेला बंद हा अनाठाई आहे, अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यात सहभागी असणाऱ्या पक्षाने किंवा महा विकास आघाडी सरकारच्या घटकाने सत्तेत असताना राज्यात बंद पुकारणे अयोग्य आहे. अशाप्रकारे राज्याला वेठीला त्यांनी धरू नये. असे त्यांनी आवाहन केले. त्या काळात कायदा सुव्यवस्थेचा

 प्रश्न निर्माण झाला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याला जबाबदार कोण? असा त्यांनी सवाल उपस्थित केला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!