Sunday, October 17, 2021

दिवाळीआधी समोर आलं धक्कादायक संशोधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: ध्वनि व वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत अनेक प्रकारचं संशोधन केलं गेलं आहे. या संशोधनांमध्ये या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणाच्या आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सांगण्यात आलं आहे. आता एका नवीन अभ्यासात आढळून आलं आहे की, वर्षानुवर्षं प्रदूषित

 हवा आणि मोठ्या रहदारीच्या आवाजात राहत असणाऱ्यांना हार्ट फेल होण्याचा धोका वाढतो वायूप्रदूषणामुळे हृदयरोग  आणि मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. ध्वनिप्रदूषणही आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मोठ्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

तुम्ही धूम्रपान करत असाल आणि तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तर हा धोका आणखी गंभीर बनतो. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.संशोधन डेन्मार्कच्या परिचारिकांवर 15 ते 20 वर्षांपासून केलं जात आहे. यासाठी संशोधकांनी 22 हजारांहून अधिक

परिचारिकांचा डेटा गोळा केला आहे. अभ्यासात 1993 किंवा 1999 मध्ये सामील झालेल्या परिचारिकांना त्यांच्या बॉडी मास इंडेक्स, जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, शारीरिक हालचाली, खाणं, आधीचं आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

त्यानंतर 2014 पर्यंत त्याच्या आरोग्याविषयी माहिती गोळा केली गेली. यामध्ये हार्ट फेलच्या प्रकरणांवर अधिक भर दिला गेला.याशिवाय या अभ्यासामध्ये वायू प्रदूषणाची पातळी जाणून घेण्यासाठी 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असलेले म्हणजेच अतिसूक्ष्म कणपदार्थ (पार्टिक्युलेट मॅटर) आणि नायट्रोजन

 डायऑक्साइडची वार्षिक सरासरी घेण्यात आली. ही आकडेवारी अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या निवासस्थानाच्या 3 किलोमीटर्सच्या परिघात गोळा केली गेली. तसंच आवाजाची तीव्रतादेखील मोजली गेली.या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये असं आढळून आलं, की 3 वर्षांमध्ये

अतिसूक्ष्म कणपदार्थांत 5.1 ug प्रति घनमीटर वाढ झाल्यामुळे हार्ट फेल होण्याच्या घटनांमध्ये 17 टक्के वाढ झाली. नायट्रोजन डायऑक्साइडमध्ये 8.6 ug प्रति घनमीटरची वाढ झाल्याने हार्ट फेल होण्याच्या घटनांमध्ये 10 टक्के वाढ झाली आहे.

रहदारीच्या आवाजात 3 वर्षांत 9.3 डेसिबलची वाढ झाल्याने हार्ट फेलच्या घटना 12 टक्क्यांनी वाढल्या. याशिवाय अतिसूक्ष्म कणपदार्थ असेल्या वातावरणात धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हार्ट फेलचा धोका 72 टक्के अधिक होता, असा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!