Saturday, October 23, 2021

आता एजेंटकडे जाण्याची गरज नाही! फक्त 350 रुपयांत घरी बसून बनवाड्रायव्हिंग लायसन्स

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स हवं आहे, तुम्ही एजेंटकडे जाण्यासाठी निघाला आहात? तर थांबा! ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तुम्ही घरी बसून फक्त 350 रुपयांत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. तुम्ही ऑनलाईनअर्ज करू शकतात. आता तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज पडणार नाही. तसेच आरटीओ ऑफिसमध्येही फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही.

मात्र, तुम्हाला शिकाऊ परवाना काढयचा असेल तर त्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल.टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शिकाऊ परवाना मिळतो. त्यानंतर एका महिन्यात कायम परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज कसा कराल?
– Https://Parivahan.Gov.In/ या वेबसाईटलर लॉगइन करा.
– स्क्रीनवर होमपेज (Homepage) उघडेल. आपले राज्य निवडा.
– नवीन ड्रायव्हिंग लायसन्सच्या पर्यायावर क्लिक करा.
– ड्रायव्हिंग लायसन्सचे टप्पे पूर्ण करा. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.

– शिकाऊ परवाना क्रमांक भरावा.
– आणि जन्मतारीख भरावी लागेल आणि OK च्या पर्यायावर क्लिक करा.
– तुमच्या स्क्रीनवर अर्ज फॉर्म दिसेल. अर्जासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
– ऑनलाईन फी भरावी लागेल.
– प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

– नियुक्तीची वेळ निवडावी लागेल. वेळ आणि दिवस निवडल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी RTO ऑफिसमध्ये हजर राहावे लागेल.
– तुमची टेस्ट घेण्यात येईल. टेस्ट पास केल्यानंतर तुम्हाला शिकाऊ परवाना 15 दिवसांच्या आत तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

काय आहेत आवश्यक कागदपत्रे..
– आधार कार्ड
– पत्त्याचा पुरावा
– वय प्रमाणपत्र
– पासपोर्ट आकार फोटो
– स्वाक्षरी
– मोबाईल नंबर

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!