Monday, October 25, 2021

आज पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजचे दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंधन दरवाढीमुळे नवीन संकट निर्माण उभं राहिलं आहे. शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 29 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागलं आहे. आर्थिक राजधानी असणाऱ्या

मुंबईत डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. शनिवारी मुंबईत डिझेल प्रतिलिटर 100.29 रुपये इतके झालं आहे. तर पेट्रोल प्रतिलीटर 109.83 पोहचलं आहे. औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे.

त्यामुळे एकूणच राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला असून, दरवाढ सातत्याने सुरू राहिल्यास इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईची शक्यताही अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर 103.84 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 92.47 रुपये इतकं झालं आहे. शनिवारी देशभरात पेट्रोल 30 ते 35 पैशांनी महागलं आहे तर डिझेलच्या दरांतही 35 ते 40 पैशांनी वाढ झाली आहे. 24 सप्टेंबरपासून देशात प्रतिलीटर डिझेल 3 रुपयांनी

तर पेट्रोल दोन रुपयांनी वाढलं आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची किंमत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 22 सप्टेंबरला क्रूड ऑईलची किंमत प्रतिबॅलर 70.70 डॉलर होती. परंतु, आता ती किंमत 74.99 डॉलरवर पोहचली आहे. इंधनाची मागणी वाढल्याने

काही दिवसांत क्रूड ऑईलची किंमत 80 डॉलरवर जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर अंदाजित दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.आपल्या शहरात काय आहेत भाव? पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार,

आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती

दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!