Sunday, October 24, 2021

नगरमधून रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा ॲाफर म्हणाले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काल अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आले होते.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तसं राजकारणात काहीही होवू शकतं. शिवसेना पुन्हा भाजपासोबत येवू शकते.

सेनेला आपलं नुकसान करायचं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही विचार करावा, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा केलं.

शिवसेना राष्ट्रवादी आणि काॅग्रेस एकत्र येवू शकते त्याप्रमाणे राजकारणात काहीही होवू शकतं. अनेक वर्षांपासून मैत्री असलेली शिवसेना आणि भाजपा एकत्र यावी हीच माझी भूमिका आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर हे एकत्र येवू शकतात. अजूनही वेळ गेलेली नसून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे

असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. असं आवाहन आठवलेंनी केलं आहे.महाराष्ट्रातही आजवर अनेक घटना घडल्या आहेत मात्र, लखमीपुरचा विषय घेऊन मोदींवर टीका केली जात आहे. लखमीपूरच्या घटनेचं आम्हाला दु:ख आहे. ही घटना चिड आणणारी आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे हिच

आमची मागणी असून लखमीपूरच्या घटनेवरून मोदींना बदनाम करण्याचा डाव आहे मात्र आम्ही हा डाव उघळून लावू, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज शिर्डीत शेकडो कार्यकर्त्यांची घरवापसी झाली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात उद्यापासून खडी क्रशर, खाणपट्टा सोमवारपासून बंद ?

माय महाराष्ट्र न्यूज: खडी क्रशर, खाणपट्टा धारकांवर जाचक अटी राज्य सरकारकडून घातल्या आहेत. त्या मागे घ्याव्यात. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात रॉयल्टी दर कमी करण्याची मागणी...

नगर जिल्ह्यात आज २२६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ११५ इतकी...

सोन्याच्या भाव आता 50 हजारांकडे

माय महाराष्ट्र न्यूज :भारतीय परंपरेनुसार, सोन्याकडे गुंतवणुकीचे माध्यम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सणासुदीत शुद्ध सोन्याचे वेढ किंवा मणी घेण्याची प्रथा आहे. आता मात्र बहुतांश...

आता आमदारकीचे स्वप्न चुकूनही पाहू नका.. शिवसेनेच्या या नेत्यांचा माजी मंत्री कर्डिलेंना टोला

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात महाआघाडी सरकार आहे . जिल्हयातील आघाडीचे तीनही मंत्री जनतेच्या प्रश्नासाठी दिवस रात्र झटत आहे . येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन्ही...

नगर ब्रेकिंग: या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले फाईल व कागदपत्रे जाळली

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अचानक आक्रमक भूमिका घेतली. ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे...

नोकरीच्या नावाखाली घरात सुरू होता सेक्स रॅकेट;तरुणींनी सांगितला भयंकर अनुभव

माय महाराष्ट्र न्यूज:मुरादाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलं आहे. येथे भाड्याने घर घेऊ सेक्स रॅकेट . रॅकेट चालविणारी व्यक्ती ही नोकरीच्या नावावर तरुणींची फसवणूक...
error: Content is protected !!