Monday, October 18, 2021

पारनेर व राहाता येथील मार्केटमध्ये कांद्याच्या भावात घसरण की वाढ जाणून घ्या भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याची सुमारे अकरा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या भावात काल वाढ झाली. एक नंबरसह चारही प्रतिच्या कांद्याच्या भावात वाढ झाली.

पारनेर बाजार समितीत शुक्रवारी कांद्याचे लिलाव झाले आहे. 11 हजार 60 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 3700 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 3400 ते 3705, दोन नंबर कांद्याला 2500 ते 3300, तीन नंबर कांद्याला 1500 ते 2400, चार नंबर कांद्याला 500 ते 1400 रुपयांचा भाव मिळाला.

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

तर राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे पाच हजार कांदा गोण्यांची काल (शुक्रवारी) आवक झाली. कांद्याच्या भावातील तेजीत आली आहे. गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी 100 रुपयांची वाढ झाली आहे.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या पाच हजार 111 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला आज 3800 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.

गुरुवारचे कांद्याचे भाव प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 3200 ते 3700, दोन नंबर कांद्याचे भाव ः 2350 ते 3150, तीन नंबर कांदा ः 1200 ते 2300, गोल्टी कांदा ः 2500 ते 2700, जोड कांदा ः 200 ते 1100.

आज शुक्रवारी मिळालेले कांद्याचे भाव ः एक नंबर कांदा ः 3200 ते 3800, दोन नंबर ः 2350 ते 3150, तीन नंबर कांदा ः 1200 ते 2300, गोल्टी कांदा ः 2500 ते 2800, जोड कांदा ः 200 ते 1100.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे. कांद्याच्या भावात वाढ होऊ लागल्याने शेतकर्य़ांमध्ये आनंदाचे वातावण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!