नगर जिल्हा बँकेत लवकरच सातशे कर्मचार्यांची भरती माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हा बँकेवर दोनदा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमनपदाची संधी मिळाली. जिल्हा बँकेत राजकारण विरहित
कामकाज होईल, लवकरच रिक्त जागांवरही भरती होईल, असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माजी मंत्री भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. अहमदनगर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार कर्डिले यांनी मंगळवारी स्वीकारला. कर्डिले म्हणाले, या आधुनिक तंत्राच्या युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नॅशनलाईज बँकेचे आव्हान उभे आहेत. ई-बँकिंग सेवा
ठेवीदार, कर्जदार व खातेदारांना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचार्यांची भरती होणार आहे. त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचार्यांचीही भरती केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल. राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.संचालक मंडळाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला
चेअरमनपदाची संधी दिली. या माध्यमातून शेतकरी, कारखानदार, व्यवसायिक व बचत गट यांना मदत केली जाईल. आज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त पदभार स्वीकारला आहे.
याच बरोबर बँकेचे संचालक, माजी संचालक, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार करण्यात आला आहे. बँकेची राजकारण विरहित सुरू असलेली परंपरा सुरू राहील.