Monday, October 25, 2021

मोठी बातमी :महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात’ भाजप नेत्याचा दावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. मात्र, तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच विरोधी पक्ष

असलेल्या भाजप कडूनही मविआ सरकारला कोंडीत पकडण्याचा एकही प्रयत्न सोडत नाहीये. याच दरम्यान आता शिवसेनेचे 12 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा भाजप नेत्याने दावा केला आहे.नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी

भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार रॅलीत बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे, आशिष शेलारही साबणे यांच्या प्रचारासाठी देगलूर येथे दाखल झाले आहेत.

सुभाष साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष साबणे हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. बबनराव लोणीकर यांनी म्हटलं, जर महाराष्ट्रात काही बदल घडवायचा असेल तर विद्यमान सरकारमध्ये मतदारांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना विजयी करा.

राज्यात चमत्कार होईल. शिवसेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात भाष्य करत असताना हा दावा केला आहे. बबनराव लोणीकर यांनी म्हटलं, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. इतकेच नाही तर राज्यात लवकरच

सत्ताबदल होण्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर लोणीकर यांनी केलेला हा दावा शिवसेनेने खोडून काढला आहे.नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी या मतदारसंघातून

रावसाहेब अंतापूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!