Monday, October 25, 2021

विधान परिषद राष्ट्रवादीकडून मिळू शकते पारनेर, शेवगाव , पाथर्डी अन् श्रीगोंद्यातील एका नेत्याला संधी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर विधान परिषदेची निवडणूक अवधी असला तरी चर्चेचे गुर्हाळ सुरु झालेले आहे. उमेदवारी मिळणार असल्याची आशा बाळगून काहींनी मात्र मोर्चे बांधणी सध्या सुरु केली आहे. मतांती आकडेवारी जुळवाजुळव सुरु झाली. यामध्ये पाथर्डी, पारनेर अन् श्रीगोंदा तालुक्यातील काहींची स्पर्धा दिसून येत आहे.

विधान परिषद निवडणूक जशी जवळ येऊ लागली. तशा राजकीय हालचाली सुरु झालेल्या आहे. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शेवगाव तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्याचे नाव चर्चेत आलेले आहे. या तीन तालुक्यातून एका नेत्याला विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तीनही तालुक्यातील इच्छुकांनी त्यांच्या परिने तयारी सुरु केली आहे. यामध्ये श्रीगोंदा व पारनेर तालुक्याने आघाडी घेतली आहे.

या तीन तालुक्यातील नेत्यांच्या नावाच्या चर्चेत नगर तालुक्याचे नाव येऊ लागलेले आहे. मात्र त्यावर एकमत होईल की नाही होणार यावर सध्या चर्चा झडत आहे. ऐन वेळी पक्षच या भाऊगर्दीत सर्व बाजू पडताळून निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आगामी लोकसभेत फायदा होईल, या दृष्टीनेच विधान परिषदेसाठी उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे विधान परिषदेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची राष्ट्रवादीच्या गोटात जोरात सुरु आहे.

पाथर्डीतील सध्या एक तर श्रीगोंदे व पारनेरातील दोन जणांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत असून दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरु आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!