Monday, October 25, 2021

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बी.बी. ठोंबरे; उपाध्यक्षपदी आ.रोहित पवार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) अध्यक्षपदी नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे,उपाध्यक्षपदी बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार रोहित पवार तर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांची असोसिएशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही राज्यातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक 2021-24 या कालावधीसाठी झाली. यात 11 सदस्य बिनविरोध निवडून आले. निवड सप्टेंबर 2024 पर्यंत 3 वर्षासाठी असणार आहे.
विभागनिहाय सदस्यांची नावे अशी…

दक्षिण महाराष्ट्र:– माधवराव घाटगे (अध्यक्ष,गुरुदत्त शुगर्स), योगेश पाटील (कार्यकारी संचालक,अथणी शुगर्स), रोहित नारा (संचालक,सद्‍गुरू श्री साखर कारखाना).

मध्य महाराष्ट्र:– पांडुरंग राऊत (अध्यक्ष,श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना), यशवर्धन डहाके (अध्यक्ष,पराग ॲग्रो फूड्स), रणजित मुळे (कार्यकारी संचालक,गंगामाई इंडस्ट्रीज).

मराठवाडा आणि खानदेश:–आ. रोहित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी,बारामती ॲग्रो’), महेश देशमुख (अध्यक्ष,लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज), बजरंग सोनवणे (अध्यक्ष,येडेश्वरी ॲग्रो).

विदर्भ:– बी. बी. ठोंबरे (अध्यक्ष,नॅचरल शुगर), समय बनसोड (संचालक,मानस ॲग्रो इंडस्ट्रीज).

तज्ज्ञ व्यक्ती:– हरिभाऊ बागडे (अध्यक्ष,छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग), रवी गुप्ता (अध्यक्ष,रेणुका शुगर्स).

खास निमंत्रित:– आमदार संजय शिंदे (अध्यक्ष,विठ्ठल कॉर्पोरेशन)

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!