Friday, October 22, 2021

नगरमध्येही सलग तिसऱ्या दिवशी अजित पवारांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट मध्ये आयकर विभागाचे पथक ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र सुरुच आहे. चौकशीत काय तथ्य समोर आल्याचे बोलले जात आहे.

मात्र ही माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. आजही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती आहे.अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर छापेसत्र सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्याचवेळी केंद्र सरकारला जोरदार टोलाही लगावला. पाहुण्यांकडून चौकशी सुरु आहे, असे म्हणत केंद्र सरकारला टोकले. सलग तिस-या दिवशी आयकर खात्याकडून चौकशी सुरू आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगर, नंदूरबारमध्ये छापेसत्र सुरू आहे. चौकशीत काय तथ्य समोर आले आहे, याबाबत माहिती गुलदस्त्यात आहे.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयावर ईडीचं छापासत्र सुरू आहे. नंदुरबार, बारामती, साताऱ्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. तर बारामतीत आयकर विभागाची छापेमारी रात्री उशीरापर्यंत होती सुरू होती. पुणे जिल्ह्यातील बारामतीत

 श्रायबर डायनामिक्स मिल्क डेअरीत आणि दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगरमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले. सलग तीन दिवसांपासुन तपासणी सुरु आहे.अहमदनगरमध्येही सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले.

तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून तपासणी आहे. तर नंदुरबारमधील समशेरपुरच्याआयान मल्टीट्रेड एलएलपी कारख्यान्यावर आयकर विभागाची टीम रात्री उशीरापर्यंत चौकशी करत होती. कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे. तसेच कारखाना व्यवस्थापनानेही मौन बाळगले आहे.

एका प्रमुख अधिकाऱ्यासोबत 12 ते 15 जणांचे पथक असल्याची सूत्रांची माहिती आहे.आजही चौकशी पुढे सुरु राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!