Sunday, October 17, 2021

सुजय विखे लाचार होऊन कोणाचेही नेतृत्व स्वीकारणार नाही!

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ.सूजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुजय विखेंनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली.

सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. कोण कोणाला पडतंय आणि कोण कोणाबरोबर जाणार आहे, हे काहीच कळायला मार्ग नाही. त्यामुळे आपल्यालाही कोणासोबत राहायचे हे ठरवावे लागेल. मात्र, कोणाचेही नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो नाही.

स्वंतत्र निघेल पंरतु, दुसऱ्या कोणा चुकीच्या माणसाच्या पाया पडायचं पाप मी करणार नाही,’ असे वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज केले. त्यांचा रोख नेमका कोणाकडे, याची आता चर्चा सुरू झाली आहे.सध्याच्या राजकीय अस्थिर परिस्थितीकडे आणि भविष्यातील परिस्थितीत काय होईल,

हे सांगता येत नसल्याकडे लक्ष वेधले. अशा परिस्थितीत आपलीही भूमिका ठरवावी लागेल, असे ते सांगत असताना कार्यकर्त्यांमध्ये पक्ष बदलायचाय काय, अशी कुजबुज सुरू झाली. त्यावर डॉ. विखे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या तरुणांना

काम करण्याची संधी मिळाली, यातच आमचे भाग्य आहे. आम्हाला भाजप सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. कोणाला सोबत घ्यायचा हा विषय आहे. ज्या माणसांनी, ज्या पक्षांनी सिंचन क्षेत्रात घोटाळे करून राज्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली त्यांचे नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो नाही.

स्वंतत्र निघेन पंरतु दुसऱ्या कोणा चुकीच्या माणसाच्या पाया पडायचं पाप करणार नाही. बाळासाहेब विखे यांनी हेच तत्व सांभाळले होते आणि आम्हालाही तीच शिकवण दिली आहे.’

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!