Friday, October 22, 2021

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी घेतले शनिदर्शन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

सोनई

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनिल केदार यांनी शनिशिंगणापुरला भेट देवून स्वयंभू शनिमुर्तीचे चौथ-याखालून मनोभावे दर्शन घेतले.पशूसेवा कार्यात उत्कृष्ट काम करत असलेल्या पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले.

मंत्री केदार यांनी उदासी महाराज मठात डाॅ.संतोष लांडे सह विधीवत अभिषेक करुन दर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थान अध्यक्ष भागवत बानकर यांनी पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले,विश्वस्त आप्पासाहेब शेटे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.सुनील तुंभारे, सहायक उपायुक्त डाॅ.माणिक धुमाळ, डाॅ.अनिल बोठे,डाॅ.राजेंद्र शेटे,पशूधन विकास अधिकारी डाॅ.बी.आर.पंडुरे, डाॅ.बी.बी.दरंदले,डाॅ.दत्ता जठार उपस्थित होते.

पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनच्या सदस्यांनी मागील महिन्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेवून समस्या मांडल्या होत्या. गडाख यांनी तातडीने पशुसंवर्धन मंत्री केदार यांची मंत्रालयात भेट घडवून आणली होती. प्रलंबित प्रश्न व नोंदणी बाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांना दर्शनासाठी निमंत्रित केले होते. आंबराई विश्रामगृह येथे असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.संतोष लांडे यांनी त्यांचा सन्मान केला.उपाध्यक्ष डॉ. अनिल कोरडे,सचिव डॉ.राहुल काळे, खजिनदार डॉ. चंद्रकांत होन ,ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ .नितीन पालवे ,सदस्य डॉ. दत्तात्रय लोहकरे ,डॉ.भीमराज लांडे, अभिजीत दरंदले इत्यादी उपस्थित होते.सोनई परीसरातील वृक्ष संवर्धन व विकासात्मक कामाचे त्यांनी कौतुक केले.

 

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!