Friday, October 22, 2021

जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पडळकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.पडळकर म्हणाले, ”जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले

याची अद्यापही माहिती दिली गेली नाही. एका आमदाराला एक अन् दुसऱ्या आमदाराला एक न्याय का असे विचारले असता तर ‘आम्ही बघतो पाहतो,” असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत.” सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील

बैठकीनंतर पडळकर बोलत होते. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार, आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. ”महाआघाडीच्या नेत्यांना विकास कामांसाठी आमदारना

जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात,” यावर गोपीचंद पडळकर हे कडाडले. बैठकीतून बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या बैठकीचा निषेध केला आहे. ”जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सर्वाना समान न्याय दयायला हवा होता,” पडळकर म्हणाले..

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या संबधित कंपन्या, नातेवाईक यांची प्राप्तिकर विभागातर्फे छापेमारी सुरु आहे, याबाबत पडळकर म्हणाले, ”अजित पवार याबाबत काय म्हणतात, याला महत्व नाही, आता आमच्याकडे तपास यंत्रणा का छापा टाकत नाहीत. त्यांच्याकडे काही कागदपत्रे असतील, त्यामुळे छापा टाकला असेल,” असा टोला पवार यांना पडळकर यांनी लगावला..

”महापुरामुळे झालेले नुकसानीची मदत अद्याप काही ठिकाणी मिळाली नाही. माझ्या आटपाडी तालुक्यातील सात गावांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यांना शेतकरी आणि पूरग्रस्तांचे पैसे खायचे आहे,” असा आरोप पडळकर यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...
error: Content is protected !!