Monday, October 18, 2021

अशा अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; वडिलांना केला हा धक्कादायक आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तळ्यात एका अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.तालुक्यातील निमगाव खैरी येथील तळ्यात काल दुपारी 11 वाजेच्या दरम्यान एक मृतदेह आढळून आला. मात्र हा मृतदेह कोणाचा हे कोणालाच सांगता येत नव्हते.

सदरचा मृतदेह कुजलेला असल्याने दुर्गंधी सुटलेली होती. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी तिच्या वडिलांनी मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला.

उशिराने या मुलीचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला.सदरची मुलगी ही गावातीलच असल्याची ओळख पटली. ती 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली होती, असे सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील रिंगमुळे तिच्या वडिलांनी तिला ओखळले. या तळ्याजवळ एका पुरुषाचा गॉगल आढळून आला आहे.

तसेच तिचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा घातपात झाला असून तिला मारुन टाकण्यात आले असल्याचे सांगितले. सदरचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!