Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असलेली श्री.व्यकटेश ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक,व्यवस्थापक, व कर्मचारी यांनी संगनमताने ठेवीदारांच्या दोन कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी महसूल विभागाने कारवाई करून पाच संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून मालमत्ता

जप्त करण्याचे आदेश नगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहेत.या बाबत अधिक माहिती की,श्री.व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाचे संचालक, व्यवस्थापक,व कर्मचारी यांनी ठेवीदारांना जादा रकमेचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांच्या

 ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारून ते परत न केल्याने या तक्रारवरून महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितरक्षण १९९९ व कलम ३,४,प्रमाणे अप्पर जिल्हादंडाधिकारी ,नगर,९ ब/८७४/२०२१ दि.३०/६/२०२१ नुसार ५ जुलै ला आदेश दिला आहे. या संचालक मंडळाच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गु.र.न.११/२०१८ भा.द.वि.कलम

४०६,४२०,४६७,४६८,४७१,१२०( ब) व महसूल ठेवी दाराच्या हितसंबंधीचे रक्षण करावे लागेल,१९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने ठेवीदारांचे पैसे मुदती नंतर परत केले नाही,त्यामुळे पतसंस्थेचे संचालक अभय शांतीलाल चंगेडिया ( शेत जमीन),आनंद अशोकलाल भळगट (प्लॉट, व शेतजमीन),तेजकुमार हिरालाल गुंदेचा

( प्लॉट) ,गोपाल रुपचंद कडेल( प्लॉट) व लक्ष्मण हरिभाऊ राशीनकर ( शेतजमीन),यांची मालमत्ता जप्त केल्याचे आदेश पारित केलेले आहेत.या मालमत्तेचे नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मंडल अधिकारी व तलाठी

यांना सातबारा उताऱ्यावर कबज्जेदार सदरी महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्याचे आदेश दिले आहेत.अन्य संचालकांवर लवकरच कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे .महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम १९९९ मधील कलम ४ चे पोटकलम ( १) व ५ व कलम ८ प्रमाणे मा.अप्पर सचिव,गृहविभाग ,

मंत्रालय, मुंबई अधिसूचना २३-६-२१ नुसार संचालक मंडळाच्या मालमत्तेवर टाच आणून जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!