Friday, March 24, 2023

धक्कादायक! लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती महिलांमध्ये H3N2 ची लक्षणे वेगवेगळी 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात सध्या H3N2 व्हायरल विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची

संख्या जास्त आहे. बदलत्या हवामानामध्ये पसरणाऱ्या या विषाणूमुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशासह महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह

इतर शहरांमध्येही H3N2 विषाणूचा संसर्ग वाढत आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगाने केलं आहे.

H3N2 फ्लू विषाणू H1N1 फ्लूचा उपप्रकार आहे. बदलत्या हवामानामुळे या विषाणूचं म्युटेशन झालं आहे. सध्या या विषाणूचा पसरणारा प्रकार अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. या विषाणूची

लक्षणे कोरोनासारखी आहेत. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी याची लक्षणे वेळीच ओळखणं आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध आणि गरोदर स्त्रिया यांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये

या विषाणूची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात. ही लक्षणे कोणती ते जाणून घ्या.लहान मुलांना H3N2 इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्यास त्यांना तीव्र ताप, पोटदुखी, मळमळ, उलट्या, खोकला, सर्दी,

कफ न निघणे किंवा न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात.H3N2 विषाणू संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांमध्ये काहीशी वेगळी लक्षणे दिसतात. गर्भवती महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी

घ्यावी आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्राँकायटिस, खोकला आणि सर्दी, जास्त कफ, अंगदुखी, डोकेदुखी H3N2 इन्फ्लूएंझाची ही लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसून येतात छाती गच्च वाटणे, तीन दिवसांपेक्षा

जास्त काळ खोकला, जुलाब, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा ही प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणे आहेत. प्रौढांना विशेषत: वृद्ध व्यक्तींना फुफ्फुसात संसर्ग वाढल्यास श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ शकतो.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!