Wednesday, October 27, 2021

मोठी बातमी:सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेन्मेट झोन परिसरात व 5 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट

असेलल्या जिल्ह्यांमध्ये सभांना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपर्यंत कमी आहे, त्या ठिकाणी अटी आणि शर्तीवरच सभांना परवानगी देण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

सभांना परवानगी द्यायची की नाही हे राज्य ठरवतील. कोरोना संसर्गा संदर्भात दर आठवड्याला येणाऱ्या रिपोर्टच्या आधारे परवानगी देणे किंवा निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारे घेतील. संसर्गाची चिन्हे ओळखण्यासाठी राज्यांना दररोज जिल्ह्यांवर बारकाईने नजर ठेवावी लागेल, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

ठरवून दिलेल्या संख्येनुसारच सभा किंवा मिरवणुका काढली जाते की नाही यावर लक्ष दिलं पाहिजे. तसेच प्रवेशाच्या ठिकाणी वेगळा प्रवेश असावा. प्रार्थनेसाठी चटाईचा उपयोग करण्यात येऊ नये. प्रसाद आणि पवित्र जल शिंपडणे आदीपासून बचाव केला पाहिजे, असंही नमूद करण्यात आलं आहे.

लोकांनी प्रवास करणं टाळावं आणि एकमेकांना भेटणं टाळावं यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ऑनलाईन दर्शन आणि व्हर्च्युअल समारंभांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याशिवाय नवरात्रीत पुतळ्याचं दहन, दुर्गा पूजा, मंडप, दांडिया आणि छठ पूजेसारखे कार्यक्रम प्रतिकात्मक झाले पाहिजे, असंही या नव्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशात आज 19,740 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 3,39,35,309 एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2,36,643 झाली आहे, ही संख्या गेल्या 206 दिवसातील सर्वात कमी आहे. संक्रमणाच्या एकूण

संख्येच्या 0.70 टक्के ही संख्या आगहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज कोरोनामुळे 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा हा आकडा 4,50,375 वर गेला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!