Wednesday, October 27, 2021

धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरचे नग्न व्हिडिओ व फोटो केले Viral

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील पिंपरी या भागातून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आता तर एका महिला डॉक्टरसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. या डॉक्टर महिलेला लग्नाचं अमिष दाखवून व्हिडीओ कॉलवर बोलण्यास भाग पाडलं.

त्यावेळी डॉक्टरचा कपडे काढून नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड या भागात 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रणव अरविंद पांचाळ या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या तरुणाविरोधात 36 वर्षीय पीडित महिलेने 8 ऑक्टोबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून व्यवसायाने डॉक्टर आहे. प्रणव पांचाळ याने महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं.

दोघे व्हॉट्सअपवरील व्हिडीओ कॉलवर बोलत असताना पीडितेला तिचे कपडे काढण्यास सांगितलं. आरोपीने महिलेचा नग्न व्हिडीओ स्क्रिन रेकॉर्ड केला आणि हे नग्न फोटो पीडितेला मेलआयडीवरुन पाठवले. याशिवाय महिलेच्या मोबाइलवरही हा व्हिडीओ पाठवला.

सहा महिन्यांपूर्वीच पीडितेचं लग्न झालं आहे. हा सर्व प्रकार 2 मार्च 2020 रोजी सुरू झाला.दरम्यान आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेला त्रास देणे, बदनामी करण्याची धमकी, विनयभंग अशा स्वरुपाची तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!