Saturday, October 23, 2021

धक्कादायक:कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत मालेगाव डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी कारवाईची मागणी करत एका व्यक्तीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीस वर्षीय तरुणाचा विवाह नुकताच म्हणजे महिनाभरापूर्वी 30 ऑगस्ट रोजी पार पडला. याबाबत रत्नागिरी येथील अशोक पाटील या व्यक्तीने 25 सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली आहे.

या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे येथे महिन्यापूर्वी झालेला विवाह बालविवाह आहे. याप्रकरणी लग्न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. ही कारवाई नाही झाल्यास आपण बेमुदत उपोषण करणार आहोत, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. या वादात भाजप

नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या लग्न सोहळ्यास कृषिमंत्री दादा भुसे यांचा मुलगा उपस्थित असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यात नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे. आई-वडिलांनीच एका 14 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या निदर्शनास ही बाब आली.

डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुक्यातील एका गावात 2020 साली अल्पवयीन मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच तिला गर्भधारणा झाली.

त्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांनतर डॉक्टरांनी सर्व प्रकार MIDC पोलिसांना सांगितला. दरम्यान या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मुलीचे

आई-वडील, पती आणि सासू-सासरे यांच्याविरोधात अत्याचार, पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!