Wednesday, October 27, 2021

तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते;नगर, सोलापूर, सातारा व पुण्यात रुग्ण वाढल्यानं धास्ती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाची दुसरी लाट राज्यातून ओसरत असली तरी अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. नगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नगरमध्ये आज 340 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यातही आकडा वाढल्याचे दिसत असून जिल्ह्यात आज 162 रुग्ण सापडले आहेत. तसेच साताऱ्यातही 102 बाधित

रुग्णांची आज नोंद झाली असून पुण्यात 264 रुग्ण आज पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेषत: या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संशोधकांनी म्हटलं आहे, की सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत अचानक वाढ आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते. तज्ञांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे, की सुट्टीचा कालावधी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता

103 टक्क्यांनी वाढवू शकतो आणि त्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात.आवश्यक आणि जबाबदार प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!