Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग:सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्‍न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :खाजगी सावकाराचा सततचा तगादा आणि मानसिक जाच या त्रासामुळे हतबल झालेल्या राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरातील गणपतवाडी भागातील ज्ञानदेव विठ्ठल शेळके या शेतकर्‍याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांना तातडीने नगर येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आपल्यानंतर आपल्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, यासाठी त्या शेतकर्‍याने राहुरी पोलीस निरीक्षकाच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवून मरणोत्तर न्याय देण्याची मागणी केली आहे.

या चिठ्ठीत संबंधित सावकारांचे नावे नसून त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. त्यामुळे राहुरीचे पोलीस निरीक्षक या घटनेबाबत आता काय दखल घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन राहुरी जि.अहमदनगर यांच्या कडेस मी स्वतः श्री.ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी ता.राहुरी जबाब लिहुन देतो की, मी तीन वर्षांपूर्वी मानोरी गावातील चार लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आहे. त्याचे आजपर्यंत व्याज दिले आहे. त्या लोकांना मी स्टेट बँकेचे चेक दिलेले आहे.

सदर लोकांनी मला वारंवार पैक्षाची मागणी करूण मानसिक ञास दिला. त्या ञासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे. याबाबत माझ्या कुटूंबियाची यात कोणताही प्रकारची चुक नाही त्यांना कुणीही ञास देऊ नये हि विनंती तसेच साहेब मी मेल्यानंतर माझ्या कुटूंबियांना ञास देऊन पैक्षाची मागणी

करूण ञास देतील तरी त्यांच्या पासून माझ्या कुटूंबियांचे संरक्षण करावे. या लोकांना मी मुद्दल रक्कम पैक्षा जास्त व्याज दिले आहे. तसेच माझे बंधू सोपान व रामदास यांना विनंती आहे की, आपल्या आईचा (बाई) सांभाळ करावा व तीचा शेवट गोड करावा

हीच माझी शेवटची इच्छा हि विनंती. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये विनंती.’ अशा आशायची चिठ्ठी लिहुन या शेतक-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!