Monday, October 18, 2021

असं केल्यास अचानक बंद होऊ शकते तुमचे व्हाट्सप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सोमवारी रात्री जगाच्या अनेक भागात अचानक बंद झाले. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर तक्रार केली की ते त्यांच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

या त्रुटीमुळे, व्हॉट्सअॅप वापरकर्ते मजकूर संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत. तसेच, व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलमध्येही समस्या होत्या.फेसबुक वेबसाइटवर मेसेज, बऱ्याच दिवसांनी समस्या सुटली सेवा बंद झाल्यानंतर, फेसबुक वेबसाइटवर संदेश येत होता, ‘सॉरी, काहीतरी गडबड आहे.

आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच ते दुरुस्त करू. डाउनडेटेक्टरच्या मते, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी मोठ्या संख्येने व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचे कळवले होते. 43 टक्के वापरकर्त्यांनी सांगितले की त्यांना व्हॉट्सअॅपमध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे. मात्र, आता या तिन्ही प्लॅटफॉर्मने व्यवस्थित काम सुरू केले आहे.

व्हाट्सऍप आज जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग ऍप आहे. मागील काही काळापासून व्हाट्सअपने नवीन अपडेटच्या माध्यमातून अनेक फीचर्स दिले आहेत. परंतु काही युजर्स व्हाट्सअपचा चुकीचा वापर करतात त्यामुळे व्हाट्सअपला युजर्सचे अकाउंट बंद करण्याचा गंभीर निर्णय घ्यावा लागतो.

सोशल मीडिया ऍपचे अनेक फेक आणि अनधिकृत वर्जन्स मार्केटमध्ये येत आहेत. हे ऍप असे फीचर्स देतात की, ते व्हाट्सअपच्या अधिकृत वर्जनमध्ये उपलब्ध नाही. ‘व्हाट्सअप प्लस’ असंच एक अनधिकृत ऍप आहे. जे अनेक लोक वापरतात.

जर तुम्ही हे ऍप वापरत असल्याची माहिती व्हाट्सअपला मिळाली तर तुमचे अधिकृत व्हाट्सअपचे अकाउंट कायमचे बंद होऊ शकते.तुम्ही व्हाट्स ऍप प्लसचा वापर करीत नसाल तरी, तुमचे व्हाट्सअप अकाउंट बंद होऊ शकते. जर तुम्ही प्रमाणापेक्षा

जास्त व्हाट्सअप मॅसेज फॉरवर्ड करीत असाल तर, तुमच्या अकाउंटवर अनेक युजर्स रिपोर्ट करू शकतात.  त्यामुळे व्हाट्सऍप तुमचे अकाउंट बंद करू शकते. नुकतेच ऑगस्ट महिन्यात व्हाट्सऍपने 20 लाखाहून अधिक अकाउंट बॅन केले होते.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!