Saturday, September 23, 2023

नगर जिल्ह्यातील नागरिकांनो आज व उद्या घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर जिल्ह्यातील नागरिकांना आज व उद्या घराबाहेर पडण्याची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी वाचूनच नागरिकांनी दोन दिवस आपली काळजी घेऊन बाहेर पडावी असे वाटत आहे.हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील

बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या विभागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. दुसरीकडे मुंबई शहरासह

उपनगर आणि ठाणे, नवी मुंबईसह रायगड परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आल्याने कमाल तापमानात घट झाली असतानाच गुरुवारसह शुक्रवारी मुंबईतही अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

सातारा, काेल्हापुरात पाऊस बुधवारी सातारा शहरासह वाई, जावळी, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिकांना मोठा फटका बसला. पाचगणीत वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या.

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १६-१७ मार्च रोजी

गारपिटीची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी. – कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

कोणत्या जिल्ह्यांना इशारा

१६ मार्च : पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली

१७ मार्च : अहमदनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!