Friday, October 22, 2021

खळबळजनक:ड्रग्ज प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्तींचा समावेश?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने नवनवे खुलासे करत असून याच प्रकरणी त्यांनी भाजपलाही टार्गेट केलं आहे. एनसीबीने सोडलेल्या लोकांमध्ये भाजपशी संबंधित लोक असल्याचा नवा खुलासा त्यांनी आज केला.

त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, एनसीबीने छापेमारीनंतर ज्या लोकांना सोडून दिलं , त्यामध्ये राष्ट्रवादीशी संबंधीत एका व्यक्तीचा समावेश होता, असा दावा त्यांनी केला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले कि, NCB ने अगोदरच सांगितले होते की त्यांनी अनेक लोकांना पकडले होते, त्याच्यातील जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं, ज्यांच्या फोन मध्ये काही पुरावे सापडले, सापडल्या, त्यांना पकडले आहे.

ड्रग ही समाजाला लागलेली कीड असून याचा बिमोड करण्यासाठी जर कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे.

ज्यांना सोडलं त्यामध्ये NCP च्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता . त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे.आयकर विभागाच्या धाडी पवार कुटुंबीयांविरोधात नाहीत

यावेळी फडणवीस म्हणाले, आयकर विभागाने ज्या धाडी टाकल्या आहेत, त्या दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाई बद्दल आयकर विभागाने 1050 कोटी रुपयांच्या दलाली चे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे, हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून कळलेलं नाही.

ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे टेंडर साठीची आहे, असे देशात पहिल्यांदाच होत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!