Monday, October 18, 2021

ऑक्टोबरनंतर कोरोनाची तिसरी लाट येणार?आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.महाराष्ट्र मध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आले आहे.

मात्र, अजूनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ‘ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही’ असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही,त्याचा मोठा परीणाम होणार नाही. असं अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आलं आहे. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही.

मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असंही ते म्हणाले.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. पण राज्यात लसींचा साठा उपलब्ध असताना देखील

काल राज्यात १५ लाख लशीचं टार्गेट पूर्ण झालं नाही. याबद्दल टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!