माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे आतापासूनच वारे वाहत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी
भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आला आहे.या महायुतीला हरवण्यासाठी महाविकास आघाडीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाला आतापासूनच सुरुवात केली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत ठाकरे गट 21, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 19 अशाप्रकारच्या जागावाटपाचे सूत्र आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या सभा घ्यायची रणनिती ठरवण्यात आली आहे.
या सभांमधून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे. या बैठकीनंतर वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांच्या नेत्यांनी भाषणं केली.