Friday, October 22, 2021

पुण्यातील धक्कादायक घटना:मिटींगसाठी बोलवून तरुणीसोबत विकृत कृत्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका युवतीला उत्पादनाची माहिती देण्याच्या बहाण्याने बोलवून तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका कंपनीच्या उत्पादनाची ग्राहकांना माहिती देण्याचं काम करते. कंपनीच्या उत्पादनाची माहिती देत असताना, पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. यातूनच आरोपीनं अन्य एका ग्राहकाला उत्पादनाची माहिती देण्याच्या बहाण्यानं

पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर बोलावलं होतं. दरम्यान आरोपीनं पीडित तरुणीची नजर चुकवून तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं यानंतर आरोपीनं पीडित तरुणीवर बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचे फोटो आणि व्हिडीओज आपल्या मोबाइलमध्ये शूट केले आहेत.

संबंधित अश्लील व्हिडीओ पीडित तरुणीच्या नवऱ्याला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, नराधम आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे.आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून 25 वर्षीय पीडित तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!