Saturday, October 23, 2021

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले पाचही बोटे तुपात असताना..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुळा साखर कारखान्याच्या 44 व्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन नंतर आयोजित कार्यक्रमात माजी खासदार यशवंतराव गडाख उपस्थित होते.

यशवंतराव गडाख म्हणाले, “मुळा साखर कारखान्यासह सर्वच संस्थेचा चांगला कारभार आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या पदामुळे सारेच काम चुटकीसरशी मार्गी लागत असुन विकास कामात सध्या तालुक्याचे पाचही बोटे तुपात असताना मिठाचा खडा टाकणाऱ्यापासून सावध राहणे आवश्यक आहे.” असा सल्ला ‘मुळा’चे संस्थापक यशवंतराव गडाख यांनी दिला.

अहमदनगर जिल्ह्यातील विविध निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. या दृष्टीने विविध राजकीय पक्ष तयारी करत आहे. नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही कार्यकर्त्यांना त्यांचा अनुभवी सल्ला दिला.

मुळा कारखान्याची आर्थिक स्थिती उत्तम असुन वीज निर्मिती, डिस्लरी प्रकल्प बरोबरच पुढील महिन्यात शंभर कोटी रुपये खर्चाचा इथोनॉल प्रकल्प सुरु होत आहे, असे सांगून गडाख यांनी 44 वर्षांत पोटच्या मुलाप्रमाणे संस्था जपून एकही डाग लावू दिला नसल्याचे सांगितले.

यशवंतराव गडाख यांनी योग्य वेळी साखर एक्स्पर्ट केल्याने संस्थेला 25 कोटीचा फायदा झाल्याचे सांगून कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, चिफ अकौंटंट हेमंत दरंदले व अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत शबासकी दिली.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!