Sunday, October 24, 2021

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मोठा दिलासा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप  यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली एक तक्रार नगरच्या न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल

करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी न्यायालयात ही खासगी फिर्याद दाखल केली होती. हे प्रकरण या न्यायालयात चालविण्यायोग्य आढळून येत नाही. आवश्यकता वाटल्यास

तक्रारदार यासंबंधी निवडणूक याचिका दाखल करू शकतो, असे सांगत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली.भांबरकर यांनी १८ सप्टेंबरला ही तक्रार दाखल केली होती. २३ सप्टेंबरला प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीत म्हटले होते की, आमदार जगताप यांनी

२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी जाहीरनाम्यात त्यांनी नगरमधील आयटी पार्क सुरू केल्याचे म्हटले होते. या आयटी पार्कमध्ये अनेक युवक-युवतींना नोकरी मिळाल्याचा दावाही केला होता. काही युवकांचे आम्हाला आयटी पार्कमध्ये नोकरी

मिळाल्याचे व्हिडिओही सादर करण्यात आले होते. यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी यासंबंधी आपण माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. तेव्हा संबंधित यंत्रणेकडून नगरमध्ये आयटी पार्कच नसल्याचे कळविण्यात आले. एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्क विषयी आपण माहिती मागितली.

त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाने आयटी पार्कला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याचे आपल्याला कळविले. याच अर्थ आमदार जगताप यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचे दिसून येते,’ असा आरोप भांबरकर यांनी केला होता.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!