Monday, October 25, 2021

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा 48 वा बॉयलर अग्नि प्रदीपन संपन्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,ऊस तोडणी-वहातुक मजूर या सर्वांच्या सहकार्याने या गळीत हंगामात 16 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 48 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन कारखान्याचे अध्यक्ष  माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे,काशीनाथ नवले यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

प्रारंभी कारखान्याचे उपअभियंता श्री.नंदकिशोर चोथे व सौ.वंदना चोथे , सिनिअर बॉयलर अटेंडन्ट श्री.अनिल मालुंजकर व सौ.दिपाली मालुंजकर या उभयतांचे हस्ते  विधिवत बॉयलर पूजा करण्यात आली.

श्री.अभंग पुढे म्हणाले, लोकनेते घुले पाटलांच्या विचारांचा मागोवा घेत भविष्याचा वेध घेण्याचा दृष्टी घुले बंधूंकडे आहे.ऊस गाळप व साखर उत्पादना बरोबरच 31.5 मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प,प्रतिदिन 45 हजार लिटर क्षमतेची डिस्टिलरी कार्यरत आहे.प्रतिदिन 50 हजार लिटर इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.मागील वर्षी आपल्या कारखान्याने शासन नियमाप्रमाणे एफआरपी प्रमाणे पेमेंट दिलेले आहे.ऊस तोडणी-वहातुकीचे संपूर्ण बिले ही अदा केलेली आहेत.कारखाना व्यवस्थापनाने चालू वर्षीच्या गाळप हंगामाची संपूर्ण तयारी केली आहे असून जास्तीत जास्त ऊस गाळप करणार आहोत.त्यामुळे सर्वांनी आपला ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा.

जेष्ठ संचालक अड. देसाई देशमुख म्हणाले, मागील वर्षी आपल्या कारखान्याने 14 लाख 50 हजार टन ऊस गाळप केल्याने आपण महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर होतो. या वर्षी जास्तीत जास्त गाळप करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्वांन सहकार्य करावे.

संचालक काकासाहेब नरवडे म्हणाले, सर्वांच्या सहकार्यांने गाळप हंगाम यशस्वी करु. सर्वांनी कारखाना प्रशासनास सहकार्य करावे.

प्रास्तविक करतांना कार्यकारी संचालक अनिल शेवाळे म्हणाले,या हंगामात 16 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष समोर ठेऊन त्यादृष्टीने करावी लागणारी सर्व पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे.ऊसतोडणी व गाळपाचे योग्य नियोजन करण्यात आलेले असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधू यांनी त्यांचा संपूर्ण ऊस  ज्ञानेश्वर कारखान्याकडेच गळीतास देवून सहकार्य करावे.

यावेळी जनार्दन पटारे,कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे,प्रा.नारायण म्हस्के, गोरक्षनाथ गंडाळ,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,लक्ष्मण पावसे,विष्णू जगदाळे,बबनराव भुसारी,कामगार संचालक सुखदेव फुलारी,घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,कामगार पतसंस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब लबडे,तुकाराम मिसाळ,डॉ.शिवाजी शिंदे, जनार्दन पटारे,अशोकराव मिसाळ,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,गणेशराव गव्हाणे,दादासाहेब गंडाळ,अशोक वायकर, शंकरराव लोखंडे,डॉ.अशोकराव ढगे,नामदेव निकम,रवींद्र गव्हाणे,राम पाउलबुद्धे, गोरक्षनाथ कापसे,हुकूमबाबा नवले,
नवनाथ साळुंके,सोपान महापूर,अंबादास कळमकर,रावसाहेब निकम,कचरदास गुंदेचा,दत्तात्रय खाटीक,प्रदीप ढोकणे,काकासाहेब काळे,अड.विनायक आहेर,राजाजी बुधवंत,संदीप बामदळे,जालिंदर आरगडे, राजेंद्र चामुटे,संतोष म्हस्के,
कारखान्याचे वर्क्स मॅनेजर एस.डी. चौधरी,तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे,चिफ इंजिनिअर राहुल पाटील,शेतकी अधिकारी सुरेश आहेर,महेंद्र पवार,विलास लोखंडे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!