Monday, October 18, 2021

WhatsApp मध्ये येतायेत ५ जबरदस्त सुविधा, बदलणार चॅटिंग स्वरुप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:व्हॉट्सअॅप हे सर्वात मोठे मेसेजिंग अॅप आहे. या अॅपची लोकप्रियता प्रचंड आहे. मात्र व्हॉट्सअॅप मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडते आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी धोरणासंदर्भात मोठा वाद निर्माण झाला होता. व्हॉट्सअॅपवर यानिमित्ताने टीकेची झोड उठली होती.

अर्थात व्हॉट्सअॅप लोकांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनल्यामुळे ते आजही सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. शिवाय त्यात नवनवीन युजर्सची भर पडते आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी म्हणून व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन सुविधा किंवा फीचर्स उपलब्ध करून देत असते.

१. मेसेज रिअॅक्शन
फेसबुक मेसेंजर आणि आयमेसेजमध्ये हे फीचर आधापासूनच अस्तित्वात आहे. लवकरच व्हॉट्सअॅपमध्येदेखील कंपनी याचा समावेश करू शकते. म्हणजेच जर तुम्हाला उत्तर देण्याची इच्छा नसेल तर तुम्ही आता कोणत्याही मेसेजचे उत्तर ईमोजीद्वारे देऊ शकता. हे फीचर ग्रुप चॅट्समध्येदेखील उपलब्ध होईल.

२. चॅट बबल्स
व्हॉट्सअॅपच्या चॅट विंडोवर ग्राहकांचा बहुतांश वेळ जातो. त्यामुळेच अॅप यावर विशेष लक्ष देऊ इच्छिते. त्यामुळेच टेक्स्टच्या शेजारी असणाऱ्या ग्रीन बबल्सला रिडिझाईन केले जाणार आहे.

३. कॉन्टॅक्ट कार्ड
व्हॉट्सअॅप आता तुम्हाला आणखी चांगले डिझाइन कार्ड दाखवणार आहे. सध्या तुम्हाला यात फक्त फोटो दिसतो. नव्या डिझाइनमध्ये तुम्हाला कॉल, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलचा डायरेक्ट पर्याय मिळेल. ग्रुप कॉन्टॅक्ट्स कार्डमध्ये तुम्हाला फक्त मेसेज पाठवण्याचा पर्याय मिळणार आहे.

४. नवे फोटो एडिटिंग टूल्स
कंपनीकडून फोटो एडिटर टूलवर काम सुरू आहे. युजर्स आता फोटोमध्ये स्टिकर्सदेखील वापरू शकतील आणि त्याला क्रॉपदेखील करू शकतील. शिवाय युजर्स फोटोमध्ये टेक्स्ट आणि इमोजीदेखील समाविष्ट करू शकतील.

५. व्हॉट्सअॅप पेमेंट शॉर्टकट
व्हॉट्सअॅप युपीआयवर आधारित पेमेंट सेवादेखील पुरवण्याचा विचार करते आहे. म्हणजेच चॅट बॉक्सवर तुम्हाला पेमेंटचा पर्याय उपलब्ध होईल. ही सुविधा आयओएसमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच लवकरच याचा समावेश अॅंड्राईड मध्येदेखील केला जाऊ शकतो

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!