Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात आज ४५१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ४५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४० हजार १६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२२ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४४७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ८०२ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२६ आणि अँटीजेन चाचणीत ७६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर २३, पाथर्डी ०१, राहता ०२, राहुरी ०८, संगमनेर ९०, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१, अकोले ०३, जामखेड ०४, कर्जत १३, कोपरगाव २६, नगर ग्रा. २२, नेवासा ०८, पारनेर ०६, पाथर्डी ०६, राहता ३७, राहुरी ०५, संगमनेर ०६, शेवगाव १४, श्रीगोंदा ४१, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७६ जण बाधित आढळुन आले. अकोले ०५, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रा. ०२, नेवासा ०२, पारनेर ०८, पाथर्डी ०४, राहता ०६, राहुरी १४, संगमनेर ११, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १८, जामखेड १२, कर्जत १६, कोपरगाव ३३, नगर ग्रा. २४, नेवासा २७, पारनेर ६४, पाथर्डी २५, राहाता ३४, राहुरी २७, संगमनेर ५०, शेवगाव ३०, श्रीगोंदा ४१, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,४०,१६५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२८०२*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९३३*

*एकूण रूग्ण संख्या:३,४९,९००*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!