Monday, October 25, 2021

भाजप नेत्यांचे खळबळजनक विधान:अजित पवारांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. हे धाडसत्र सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी रडणं बंद करावं. अजितदादांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिन्या सोबत संवाद साधताना हा दावा केला आहे. आहे त्या पदावर राहून माझ्यावर अन्याय होतो असं अजित पवार सांगतात. तुमच्यावर अन्याय कसला झाला? किती वर्ष मंत्रीपदावर आहात? तुमच्या मंत्रीपदाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला?

म्हणून अजित पवार यांनी रडणं बंद करावं. जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता. अजित पवारांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता, असं राणे म्हणाले.पवारांवर धाडी पडतात याचा अर्थ त्यांनी काही तरी गडबड केली असणार.

गडबडीसाठीच त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. विधायक कामांसाठी त्यांचं नाव आहे असं एखादं उदाहरण मिळणार नाही. म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कंपन्यांवर रेड पडतेय याचा अर्थ गडबड केली असणार त्यांनी. म्हणून रेड पडत आहे. आता अजित पवार जे काही रडत आहेत.

त्यांनी किती कुटुंब उद्ध्वस्त केली. किती लोकांना धंद्याला लावलं हे विसरले. ही नियती आहे. इथेच भोगावं लागतं. अजित पवार साहेब इथंच भोगणार तुम्ही. हे आता लांबपर्यंत जाणार. अजित पवार आता यातून सुटू शकणार नाही. हे त्यांनाही कळून चुकलं आहे, असं सांगतानाच माझ्यावर असं झालं तसं झालं.

असं ते सांगत आहेत. मागेही रडले होते पत्रकार परिषदेत. राष्ट्रवादीत रडेच भरले आहेत. यांच्यावर आरोप झाल्यावर हे रडतात. तुम्ही कारवाईला सामोरे जा. राजीनामा द्या. मग बघू तुमचं काय होतं ते, असं आव्हानच त्यांनी दिलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!