Friday, October 22, 2021

आमदार निलेश लंके म्हणतात सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातीलकर्जुले हर्या (ता.पारनेर) मांडओहळ धरणातील पाण्याचे जलपूजन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, संजीव भोर,

अॅड. राहुल झावरे, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी, रामदास दाते, शशिकांत आंधळे, चंद्रभान ठुबे, उद्योजक किशोर ठुबे, उपविभागीय अभियंता व्ही.टी.शिंदे उपस्थित होते.अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांत होणार आहेत.

त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांत आपले विरोधक कोण असणार त्यांचा सामना कसा करायचा याची रणनीती आखली जात आहे. या संदर्भात आमदार नीलेश लंके यांनी महत्त्वाचे राजकीय वक्तव्य केले आहे.

आमदार लंके पुढे म्हणाले, मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. मतदारसंघात आलेला विकासनिधी हा माझ्या माध्यमातून येतो. काहींचा परस्पर गपचूप उद्घाटन करण्याचा तो प्रकार सुरू आहे. तो चुकीचा आहे त्या कार्यक्रमांना शासकीय अधिकारी व ठेकेदार देखील उपस्थित नसतात. पाणी अडविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील अनेक गावांना बंधाऱ्यांसह अन्य कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात व अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकी बाबत काय निर्णय होईल ते पाहू. मात्र पारनेर तालुक्यात मी विरूध्द सर्व असंतुष्ट असाच सामना होईल मात्र या सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात आहे, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...
error: Content is protected !!