Sunday, October 17, 2021

रोहित पवार म्हणाले; म्हणाले, “मी त्यालाही ओळखत नाही आणि…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात २ ऑक्टोबरला एनसीबीनं केलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबीनं क्रूजवर केलेली कारवाई हा बनाव असल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांसोबत रोहित पवार देखील दौऱ्यावर असून त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही. पण जर कारवाई होत असेल, तर सगळ्यांना समान न्याय असायला हवा. एनसीपीच्या कारवाईत काही भाजपाचे कार्यकर्ते होते. हे पाहाता काहीतरी चुकतंय का? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतोय. त्याची उत्तरं दिलीच पाहिजे. कोणतीही कारवाई राजकीय हेतूने न होता योग्य पद्धतीने व्हावी”, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणेंनी ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर देखील रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “सुशांत सिंह असो वा आर्यन खान असो. ड्रग्जच्या बाबतीत कोणत्याही एजन्सीने हलगर्जीपणा करायला नको.

मग ती राज्य सरकारची यंत्रणा असो वा केंद्र सरकारची यंत्रणा असो. नितेश राणेंना नेमकं काय म्हणायचं आहे ते मला कळत नाहीये. कारण ड्रग्ज हे घातकच असतं. पण नवाब मलिक जो मुद्दा मांडतायत, त्यात इतकंच म्हणणं आहे की कोणतीही व्यक्ती असली, तरी त्यात भेदभाव करू नये.

एखाद्या व्यक्तीला पकडलं असेल किंवा कारवाई सुरू असेल, तर ज्यांना तुम्ही सोडलं आहे, त्यांना का सोडलंय? याचीही शहानिशा करायला हवी. जेव्हा एखाद्या बोटीवर १००-२०० पेक्षा जास्त मुलं-मुली असतात आणि ठराविक लोकांनाच पकडलं जात असेल, तर बाकीच्यांना का सोडलं? आपल्याला संदेश काय द्यायचाय?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!