Friday, October 22, 2021

पावसाने झोडपलं; शेतकरी म्हणतो,’पवारसाहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. गेल्या १५ दिवसांत उस्मानाबादमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. खेड, तेर, ढोकी या परिसरात सलग तीन तास पावसाची संततधार कायम होती, ज्यामुळे सोयाबीनसह तूर, उस अशा पिकांचं नुकसान झालं आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, शेतकरी आता खरा भिजला आहे त्याला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसामुळे वाया गेलेल्या पिकाकडे हताशपणे पाहताना शेतकरीमाझं शिक्षण पूर्ण झाल्यावर केवळ खुल्या प्रवर्गात येत असल्यामुळे मी बेरोजगार राहिलो. शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा निसर्गानेही अशी अवस्था करुन ठेवली आहे. माझी ९० टक्के शेती पाण्यात आहे.

पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग होत नाही, शेतकरी आता खऱ्या अर्थाने भिजला आहे त्याला मदत करा. आमदार-खासदार फक्त रस्त्याच्या कडेला येऊन पाहणी करुन जातात. मागे बचावासाठी हेलिकॉप्टर आलं त्याचं श्रेय घेण्यासाठी भांडणं सुरु झाली. आमदार-खासदारांनी एक रूपयाचीही मदत न करता

आमच्यासोबत शेतात फिरून दाखवावं”, अशी उद्विग्न प्रतिक्रीया काकासाहेब लोमटे या तरुण शेतकऱ्याने दिली.हातात आलेलं पीक वायागेल्यामुळे आता पुढे काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेउस्मानाबादमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं. सोयाबीनचं पिक

पाण्यात राहिल्यामुळे त्याची कुजून नासाडी होत आहे. सरकारने पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून होते आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्यामुळे जगावं की मरावं अशी अवस्था आली आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!