Monday, October 25, 2021

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल किंमतीत पुन्हा मोठी वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई,

हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.मागील कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच आहे.

सप्टेंबरपासून सुरू असलेली इंधन वाढ ऑक्टोबर महिन्यातही कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ केली आहे. आज पेट्रोल 30 पैसे प्रति लीटर तर डिझेल 35 पैसे प्रति लीटरने महागलं आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी वाढला आहे. तर डिझेल दरात 3.30 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात.

तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा

 लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

> दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये आणि डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर

> मुंबईत पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर

> चेन्नईत पेट्रोल 101.79 रुपये आणि डिझेल 97.59 रुपये प्रति लीटर

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!