माय महाराष्ट्र न्यूज:लग्नात भांडण झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला लग्नानंतरच्या भांडणाची अशी बातमी सांगणार आहोत,
जी वाचून तुम्हीही तोंडात बोट घालाल. यूपीच्या एका जिल्ह्यातून एक अजब प्रकार समोर आला आहे. इथे लग्नानंतर पहिल्याच रात्री वराला वधूची एक मागणी पूर्ण न करणं चांगलंच महागात पडलं.
लग्नाच्या पहिल्या रात्री परंपरेनुसार दिल्या जाणाऱ्या पैशांवरुन हे सगळं घडलं. नववधूच्या इच्छेनुसार रक्कम न मिळाल्याने तिनं थेट संसारच मोडण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे प्रकरण विचित्र वाटत
असेल. मात्र वधूला मनवता मनवता नवरदेवाला घाम फुटला.हे संपूर्ण प्रकरण मुरादाबाद दिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या गावातील एका तरुणाने आठवडाभरापूर्वीच जवळच्या गावातील
मुलीशी लग्न केले होते. लग्नात दोन्ही पक्षांनी खूप खर्च केला. मात्र लग्नानंतर पहिल्या रात्रीच दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला.पत्नीने पतीला ‘मुंह दिखाई’ म्हणून वीस हजार रुपयांची मागणी केली. मात्र वराने सात हजार
रुपये देण्याची तयारी दर्शवली. जे वधूने घेण्यास नकार दिला. मग काय, लग्नाच्या पहिल्याच रात्री दोघांमध्ये वाद सुरू झाला.यानंतर, नववधू तिच्या माहेरच्या घरी गेली. घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार घरच्यांना
सांगितला आणि सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. यानंतर या प्रकरणाची माहिती वधूच्या पतीला देण्यात आली. नवीन सून नाराज झाल्याने सासरच्या मंडळींना काळजी वाटू लागली.
दोन्ही बाजूच्या लोकांनी आणि वराने वधूला समजवण्याचा शक्य तो प्रयत्न केला. पण ती तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. प्रकरण वाढत असल्याचं पाहून या प्रकरणी पंचायत बोलावण्यात आली. बऱ्याच जणांनी
वधूला समजावून सांगितले. प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हे प्रकरण मिटलं आणि मुलगी पतीसह सासरच्या घरी जाण्यास तयार झाली.