Saturday, October 23, 2021

ऊस तोडणी मजूर-मुकादमांनी ऊस तोडणीकरीता पैशांची मागणी केल्यास कारवाई करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे कडून ऊस तोडणीकरीता पैशांची मागणी होत आल्यास कारवाई करा असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहेत.

ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे कडून ऊस तोडणीकरीता पैशांची मागणी होत आल्याच्या तक्रारी
ऊस उत्पादक शेतक-यांकडून साखर आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत.

त्या अनुषंगाने साखर आयुक्त यांनी साखर कारखान्यांना दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की,ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचेकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतक-यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतक-यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालक यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत.
राज्यात चालू 2021-22 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथॅनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतक-यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचे संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे.
शेतक-यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन-व्हॉटसॅप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकरयांना होणेकरिता प्रसिद्धी द्यावी.

सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर-मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येते की, अशा स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करणेसाठी कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिका-यांची नेमणूक करावी. सदर तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करावी. शेतक-यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकारी यांचेकडे घटना घडल्यावर लगेच करावी. तसेच तक्रार करण्यासाठी शेतक-यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये मजूर, मुकादम,वाहतूकदार यांचे नाव व वाहन क्रमांक नमुद करावा.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर ,मुकादम, वाहतूकदार यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम मजूर,मुकादम,वाहतूक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधीत शेतक-यास अदा करावी. याची जबाबदारी तक्रारनिवारण अधिकारी यांचेवर सोपवावी.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर,मुकादम,वाहतूकदार यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!