Monday, October 18, 2021

घर तेथे शोषखड्डा;भेंडा बुद्रुक ग्रामसभेचा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

सांडपाणी व्यवस्थापन व जल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घर तेथे शोषखड्डा उपक्रम राबविण्याचा निर्णय भेंडा बुद्रुक ग्रामसभेने घेतला आहे.

नेवासा तालुक्यातील निर्मल ग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीची ग्रामसभा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,सरपंच सौ.वैशाली शिवाजीराव शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत झाली.

ग्रामसभेत झालेल्या चर्चेत जलमित्र सुखदेव फुलारी यांनी गावातील सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी व जल पुनर्भरणाला हातभार लावण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या कामाअंतर्गत घर तेथे शोषखड्डा घेण्यात यावा अशी सूचना मांडली.सचिन तागड यांनी व्यायामाचे साहित्य व पाणी शुद्धीकरण प्रकल्पचा गावकऱ्यांना लाभ मिळावा,कारखाना कर वाढवून मिळावा याबद्दल सूचना केल्या.अमोल जोगदंड यांनी प्रभागातील रस्ते तयार करतांना प्रथम सोलिंग करून किंवा मुरूम भरून त्याची उंची वाढवावी अशी सूचना केली.

नळ जोड व पाणी पुरवठा,ग्राम निधी जमा-खर्च वाचन,व्यवसाय करात वाढ करणे, 21 लाख रुपये थकीत घरपट्टी व 27 लाख रुपये थकबाकी पाणीपट्टी वसुली करणे, म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व्ययक्तीक व सार्वजनिक लाभाची कामे, योजना,कारखना कर ठोक अंशदान वाढून घेणे,विधी शिबिर घेणे,ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करणे,मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे,पाणी शुद्धीकरण प्रकल्प,रेशन कार्ड या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

*लोकनेते घुले पाटलांचे नाव देण्याचा ठराव…*
भेंडा गावासाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर करून निधी दिल्याबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे तसेच या रुग्णालयासाठी जमीन दिल्याबद्दल कडूभाऊ काळे यांच्या आभाराचा व अभिनंदनाचा ठरवा ग्रामपंचायत सदस्या सौ.संगीता गव्हाणे यांनी मांडला. तर या रुग्णालयाला लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव सचिन तागड यांनी मांडला.हे दोन ही ठराव ग्रामसभेने मंजूर केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,अशोकराव मिसाळ, गणेशराव गव्हाणे,शिवाजीराव तागड,अंबादास गोंडे,ग्रामपंचायत सदस्या सौ.संगीता गव्हाणे,सौ.लता सोनवणे, सौ.उषा मिसाळ,सौ.सुहासिनी मिसाळ,सौ.मंगल गोर्डे, नामदेव निकम,बलभीम फुलारी, कादर सय्यद,अण्णासाहेब गव्हाणे,देविदास गव्हाणे,पंढरीनाथ फुलारी, देवेंद्र काळे,नामदेव शिंदे,बाळासाहेब वाघडकर,राजू चिंधे,किसन यादव,कृष्णा गव्हाणे,शिवाजी फुलारी,किशोर मिसाळ, दिलीप गोर्डे,सचिन तागड,सुहास वेताळ,अमोल जोगदंड,कृष्णा गव्हाणे, यडूभाऊ सोनवणे,मुख्याध्यापक माणिक जगताप,मुख्याध्यापक शकील शेख, मुख्याध्यापक प्रदीप चक्रणारायण, मुख्याध्यापक सुनील गायकवाड,ग्रामसेवक रेवनाथ भिसे,बाबासाहेब गोर्डे,विष्णू फुलारी आदी यावेळी उपस्थित होते.
नामदेव निकम यांनी आभार मानले.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!