Monday, October 25, 2021

सोयाबीनचे दर आणखी कमी होण्याची भीती, सध्या ‘इतका’ दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदाच्या खरिपातील सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून नवीन सोयाबीनची बाजारातील आवक वाढली असताना भाव मात्र पडू लागले आहेत. मे महिन्यात दहा हजाराचा टप्पा पार करणाऱ्या सोयाबीनला हंगामात मात्र 4 हजार 200 ते 5 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली.

भाव स्थिर जरी राहिले नाहीत तरी चढे दर मात्र कायम होते. केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला 3,950 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. स्थानिक बाजार समितीत शनिवारी (ता.9) नवीन सोयाबीनची 9 हजार 737 पोत्यांची आवक नोंदविण्यात आली.

लिलावात सोयाबीनला किमान भाव 4200 रुपये प्रतिक्विंटल व कमाल भाव 5200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. सरलेल्या सप्ताहात नवीन सोयाबीनला याच श्रेणीत भाव मिळाले आहे. आवक वाढल्यानंतर पुन्हा भाव घसरण्याची शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे.

एन हंगामात भाव कोसळू लागल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे. बाजारातील तेजी कायम राहावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.भाव स्थिर राहणार नाहीत -सोयाबीनची आवक वाढेल

तसा भाव कमी होत जाईल असा अंदाज आहे. सद्या बऱ्यापैकी भाव मिळत आहे. केंद्राचे आयात धोरण व स्टॉक लिमिट याचा एकंदरीत परिणाम शेतमाल खरेदीवर होणार आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!