Friday, October 22, 2021

मंत्री प्राजक्त तनपुरेंचा महाराष्ट्रातील जनतेला शब्द ;निर्धास्त रहा, ती वेळ येऊ देणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर दौ-यावर होते . दरम्यान त्यांनी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.दसरा दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे.

अशा परिस्थितीत राज्यावर वीज निर्मितीचं संकट असलं तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही”, असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.लोडशेडिंगच्या संकटापासून वाचवण्याचे आमचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.

वीज निर्मिती कंपन्यांकडून चढ्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवली जात आहे. आगामी काही दिवसातच सर्व सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारच्या कोळशाच्या खाणीतील मजदूरांचा संप तसेच पाऊस आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव त्यामुळे कोळशाची

कमतरता असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र ग्राहकांवर आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. वीज निर्मितीसंबंधी कामे आम्ही डोळ्यात तेल घालून करु , अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत इंधनाच्या वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे.

कोळशाच्या संकटामुळे पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्येही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परळी येथील वीज निर्मिती केंद्रावर देखील प्रभाव पडला आहे

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!