Friday, October 22, 2021

शरद पवार मोदींची भाषा बोलताहेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद पुकारलेला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेचा समाचार घेतला. राज्य सरकार आणि शरद पवार आता मोदींचीच भाषा बोलत असल्याचा सांगत राजू शेट्टी यांनी टीकास्त्र डागलं.

बीडच्या मांजरा नदीकाठच्या गावांना राजू शेट्टी यांनी भेट दिली. “ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी १० रिकव्हरील २९०० एफआरपी जाहीर झालेली आहे. मात्र महाराष्ट्रातील साखरेचा उतारा लक्षात घेता आणि तोडणी वाहतुकही त्यातून वजा केली जाते.

तर एकूण एफआरपीवर रिकव्हरी ठरते. त्याचा विचार केल्यास सांगली, कोल्हापूर भागात २८०० ते ३००० रुपयांपर्यंत बसते, तर मराठवाड्यात २५०० ते २६०० पर्यंत बसते; परंतु इथे रिकव्हरी मारली जाते. चोरली जाते तसेच तोडणी आणि वाहतुकीचा खर्च जास्त दाखवला जातो यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लूट होते”, असं शेट्टी म्हणाले.

“केंद्र सरकार एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. नीती आयोगाचा रिपोर्ट तयार झालेला आहे. कृषिमूल्य आयोगानं शिफारस केली आहे आणि जे काही चौदा पंधरा राज्यातील वेगवेगळे ऊस पट्टे आहेत, त्या राज्यांचा केंद्र सरकारने अभिप्राय मागितला आहे.

त्यामुळे महाराष्ट्राने देखील तीन तुकडे करायला काही हरकत नाही अशी भूमिका घेतलेली असल्यामुळे ही दुर्दैवाची गोष्ट आहे”, अशी टीका शेट्टी यांनी केली.भारतीय जनता पार्टीचे लोक हे शेतकरी विरोधी आहेत. त्यांना शेतीतील काही कळत नाही म्हणून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं आहे आणि तेही

 आता शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्याने पैसे द्या असं म्हणते म्हणजेच पवार साहेब मोदींची भाषा बोलत असतील, तर त्यांनी खुशाल बोलावी मात्र महाराष्ट्रातील शेतकरी एकरकमी एफआरपीवर ठाम आहे आणि ठामच राहणार”, असं शेट्टी यांनी सुनावलं.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!