Saturday, September 23, 2023

नगर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात मागच्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात

आले आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे 48 तास राज्यातील वातावरण असेच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात विविध भागात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्यातील कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील

नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, या भागात गारांचा पाऊस होण्याची शक्यात आहे.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम. यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जोरदार पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामान असल्याने पुढील काही दिवस राज्यात

पावसाची शक्यता आहे. आज (ता. 17) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!