Monday, October 25, 2021

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशाला देणार मोठी भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था आता पुन्हा रुळावर येत आहे. कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. याचा थेट परिणाम रोजगार आणि नोकऱ्यांवर झाला. या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या किंवा रोजगार गमवावा लागला.

याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. मात्र आता अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळावी यासाठी सरकार नवनव्या योजनांची घोषणा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी 15 ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावरून गतिशक्ती योजनेची घोषणा केली होती.

100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या लॉंच केली जाणार आहे.या योजनेच्या माध्यमातून देशातील रोजगार संधी सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पंतप्रधान गतिशक्ती योजनेची वैशिष्ट्ये- 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतिशक्ती योजनेची घोषणा केली.

– गतिशक्ती योजनेसाठी एकूण 100 लाख कोटींची तरतूद निश्चित करण्यात आली आहे.-

पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून देशातील युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

– ही योजना पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल.

– स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धक म्हणून ओळख मिळणार.
– या योजनेंतर्गत नवी अर्थिक क्षेत्रंही विकसित केली जाणार.

– प्रगत पायभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या निर्मितीत समग्र दृष्टीकोन स्विकारला जाणार.
– या योजनेव्दारे संपूर्ण पायाभूत सुविधांचा पाया तयार केला जाईल

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!