Saturday, October 23, 2021

या’ 5 चुका केल्या, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या सणासुदीच्या काळात धोकादायक ड्रायव्हिंग व वाहतुकीचे नियम मोडणे तुम्हाला अधिक महागात पडणार आहे. 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी व 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी तुम्ही रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवणे गरजेचं आहे.

देशात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा कित्येक पटीने अधिक झाली.या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर तुमची एक छोटीशी चूकही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी पुरेशी असेल. त्यामुळे वाहन चालवताना

या पाच गोष्टी विशेष ध्यानात ठेवाव्या लागतात. धोकादायक पद्धतीने किंवा अल्कोहोलच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यास भारी दंड आकारला जातो.आधी लोक ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतरही वाहन चालवत होते, पण आता यासाठी नियम कडक करण्यात आलेत.

त्याचप्रमाणे वाहनाच्या प्रदूषण प्रमाणपत्रासारखी कागदपत्रेही पूर्वीच्या तुलनेत अद्ययावत ठेवली जात आहेत. चालकांच्या सतर्कतेमुळे रस्ते अपघातही कमी झालेत. तरीही हेल्मेट नसलेल्या चालकांची संख्या अजूनही जास्त आहे.

नवीन नियमांनुसार, पोलीस किंवा वाहतूक अधिकाऱ्यासोबत वाईट वागणूक, वाहन न थांबवणे, ट्रकच्या केबिनमध्ये बसणे हे वाईट वर्तन मानले जाते. तसे आढळल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकते. तसेच दंड आकारला जाऊ शकतो.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या नवीन नियमांनुसार, बसमध्ये जादा चढणे, प्रवाशासोबत गैरवर्तन करणे, स्टॉपवर न उतरणे, बस चालवताना धूम्रपान करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, अनावश्यक वाहन चालवणे, बसमध्ये सिगारेट आणि मद्यपान आता ड्रायव्हरला महागात पडेल.

नवीन वाहन कायद्यात कागदपत्रे नेण्याच्या त्रासापासून सुटका झाली आहे. नवीन नियमांनुसार, वाहतूक पोलीस आणि आरटीओला दंडाची रक्कम आणि पोर्टलवर चालकांवर केलेल्या कारवाईची नोंद करणेदेखील बंधनकारक करण्यात आले.

नवीन मोटार वाहन कायदा 2019 चे नियम, दंडाची रक्कम, चालान याबाबत बरेच बदल करण्यात आलेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी नवीन मोटर कायद्यात ठोस तरतुदी करण्यात आल्या. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड कडक करण्यात आला असून, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) यासह RC आणि मोटर इन्शुरन्स यांसारख्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आलेत.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!