Sunday, October 24, 2021

महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी पाळावयाची सर्व मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक

तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी,

स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची तपासणी करणे, आणि आत येणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची

आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समध्ये

अनेक सिनेमे वेगवेगळ्या पडद्यांवर दाखवले जातात, अशावेळी मध्यांतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी जसे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुद्धा लसीकरण करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!