Monday, October 18, 2021

तज्ज्ञांचा अंदाज:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत इतक्या पट रुग्ण अधिक वाढतील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दुसऱ्या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसऱ्या लाटेत दिड पट रुग्ण अधिक आढळतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटना व भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विषयक तज्ज्ञांनी भारतात आणि राज्यात

कोविड आजाराची तिसरी लाट येण्याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी सर्वाधिक रुग्ण कधी होते त्याची नोंद घेऊन त्याच्या दीडपट रुग्ण तिसऱ्या लाटेमध्ये आढळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे, राज्य सरकारने सर्वतोपरी तयारी सुरु केली आहे.

या एकूण रुग्णांपैकी 65 टक्के रुग्ण हे घरगुती विलगीकरणात असतील त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याची गरज भासणार नाही. 35 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची आवश्यकता भासेल या 35 टक्के रुग्णांपैकी 17.5 टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतील तर, 17.5 टक्के रुग्ण सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेतील.

या 17.5 टक्के रुग्ण संख्येस आठ टक्के रुग्णांसाठी समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये डीसीएच खाटा उपलब्ध करण्यात येतील. चार टक्के व्हेंटिलेटर आणि चार टक्के ऑक्सिजन बेड्स असे हे प्रमाण असेल. तसंच, या रुग्णांसाठी 32 टक्के ऑक्सिजन बेड निर्माण करण्यात येतील.

त्यासाठी आठ टक्के ऑक्सिजन बेड्स समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये डीसीएच तर 24 टक्के ऑक्सिजन बेड हे समर्पित कोविड आरोग्य केंद्रात डीसीएचसी असतील.लहान मुलांसाठी ही तयारी तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय असेल

अंदाज लक्षात घेता लहान मुलांसाठी काही खाटा आरक्षित करण्यात येतील. समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये पाच टक्के, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये दहा टक्के आणि समर्पित कोविड निगा केंद्रात 15 टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील.

ऑक्सिजन वितरणासाठी ऑक्सिजनची उपलब्धता ऑक्सिजन जनरेशन ऑक्सिजन स्टोरेज या दोन प्रकारे करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!